Monday, February 17, 2020

श्री शनि स्तोत्र

श्री शनि स्तोत्र( साडेसातीमध्ये दररोज सकाळ संध्याकाळी)
नमस्ते कोण संस्थाय पिंगलाय च नमोस्तुते
नमस्ते बभ्रुरूपाय कृष्णाय च नमोस्तुते||१||
नमस्ते रौद्र देहाय नमस्ते चांतकायच
नमस्ते यमसंज्ञाय नमस्ते सौरये विभो ||२||
नमस्ते मंदसंज्ञाय शनैश्चराय नमस्ते
प्रसादं कुरु देवेश दिनस्य प्रणतस्यच ||३||
कोणस्थ पिंगलो बभ्रू कृष्णौ रौद्रत्मको यम:
सौरी शनैश्चरो मंद पिप्पलादेन संस्तुत
एतानि दशनामानि प्रातरुत्थाय य पठेत
शनैश्चर कृपा पीडान कदाचित भविष्यती
सिद्ध  श्री शनि यंत्र पुजन विधान –
ज्यांना श्रीशनिदेवांची पीडा असेल किंवा नसलेल्या त्या सर्वांनी श्रीशनि यंत्र पुजन अभिषेक करायला पाहिजे.प्राणप्रतिष्ठीत श्रीशनि तांब्याचे यंत्र एका भांड्यात घ्यावे व त्यावर २१ वेळा मोहरीच्या(सरसोच्या) तेलाचा अभिषेक करावा.व प्रत्येकवेळी २१ वेळा श्रीशनिचा पौराणिक मात्रा म्हणावा.
पौराणिक मंत्र-     निलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम
                छाया मार्तंड संभुतं तं नमामि शनैश्चरम
ते साठवलेले सर्व तेल दुसऱ्या भांड्यात घ्या व त्यामध्ये आपला चेहरा बघा व श्रीशानिंना आपले कष्ट,बाधा,परेशानी सांगा व क्षमा  प्रार्थना करा व आपली पीडा,त्रास कमी व्हावी म्हणून विनंती करावी.त्या तेलामध्ये लोखंडी खिळा टाकावा.ते तेल खिळयासकट  पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे.(तेलाभिषेक सुरु केल्यापासून पिंपळावार तेल वाहावे पर्यंत आवर्जुन मौन पाळावे)व तेल अर्पण केल्यावर सरळ घरी यावे.(खिळा दान स्वरूप आहे). हे सलग ९ शनिवार करावे.
९व्या शनिवारी ज्या भांड्यात चेहरा पाहिलेला आहे ते भांडेही पिंपळाला अर्पण करावे.
प्रत्येक शनिवारी तिळगुळाच्या लाडवांचा प्रसादसुद्धा पिंपळाला अर्पण करावेत.
ह्या प्रयोगाने श्रीशानिदेव कठिणात कठीण परिस्थितीत मार्ग प्रदान करतात.
शनिवारच्या उपवासाचे नियम  
१)शनिवारच्या उपवासाच्या दिवशी संकल्प करून ७,९,१६ किंवा ३३ शनिवार होईपर्यंत आपल्या अत्यंत आवडता खाण्याच्या पदार्थाचा त्याग करावा.उपवास पुर्ण होईपर्यंत तो पदार्थ खाणार नाही असा संकल्प करावा.
२)शनिवारी सुर्योदयापुर्वी उठुन पौराणिक मंत्राच्या ३ माळाकराव्यात.श्रीशनि यंत्रासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा,तिळगुळाच्या लाडवांचा नैवेद्य ठेवा.शानिचालीसाचा पाठ करावा,कर्पूरआरती करावी.हे सर्व झाल्यानतर प्रसाद पिंपळाच्या झाडाखाली ठेवावा.
३) शनिवारी सुर्योदयापुर्वी गुळ,तीळ,उडीद मिश्रित पाणी शनिदेवांची १० नावे घेत पिंपळाला घालावे.
४) शनिवारी १ वेळचे जेवण आळणी कांदा,लसून शिवाय करावे व १ वेळचे आपले जेवण एखाद्या गरीबाला दान करावे.
५) शनिवारी ब्रह्मचर्य पाळावे.
६)शनिवारी व्रत/उपवासाचा अधिक फायदा मिळण्यासाठी त्या दिवशी अजिबात क्रोध करू नये.
७) शनिवारी श्रीशनी मंदिर किंवा श्रीहनुमान मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन घ्यावे.श्रीहनुमान चालीसा आणि श्रीशनि चालीसाचा पाठ करावा.
श्री शनि उपासकांसाठी आवश्यक नियम
१) सुर्योदयापुर्वी श्रीशानिदेवांच्या      मध्ये उठावे.
२)सकाळी उठल्यावर अंथरुणातच श्रीशानिदेवांच्या १० नावांचे ११ वेळा स्मरण करावे.`दिवसभर आपली कृपा राहावी व आपला क्रोध शांत व्हावा यासाठी मी आपले स्मरण केलेले आहे’’असे म्हणावे.
३) शनिवारी सकाळी प्रातःस्नान  होईपर्यंत मौन व्रतधारण करावे.
४)आमली पदार्थ,द्रव्याचे सेवन बंद करावे लागेल.
५) शनिवारी श्रीशनि कृपा प्राप्तीसाठी इदं न मम चा भाव नेहमी हृदयात करावा की आपल्या कणा कणात ईश्वराचा आभास करून आम्ही सर्वासमोर झुकतो आहे,थोडक्यात मनामध्ये जरासुद्धा अहंकार धरू नये.
६) सुर्योदयापुर्वी अंघोळीनंतर श्रीशनि यंत्राजवळ तेलाचा दिवा लाऊन श्रीशनी स्मरण करून श्रीशनी चाळीसाचा पाठ करावा.
७)बीजमंत्र-ॐ शं शनैश्चराय नमः चा ११ माळा जप करा किंवा यथाशक्ती जप करावा.
८)शनिवारी थोडाश्या पाण्यात गुळ घालुन गोड करावे व त्यात १ चमचा काळे उडिद,काळे तीळ घालुन श्रीशानिदेवांचे १० नावांचे उच्चारण करत प्रदक्षिणा घालत पिंपळाला अर्पण करावे.
९)दर शनिवारी सुर्योस्तानंतर तीळगुळाच्या लाडवांचा प्रसाद दाखवावा व मोहरीच्या तेलाचा मातीचा दिवा लावावा.
१०)शनिवारी आपला क्रोध अधिकाधिक शांत ठेवा.  
श्रीशनि कृपा प्राप्तीसाठी
१)सुर्योदय किंवा सुर्योस्तानंतर गुळ,तीळ,काळे उडीद यांचे पाणी अर्पण करावे व मोहरीच्या तेलाचा दिवा पिपळाखाली लावावा.
२) सुर्योदय किंवा सुर्योस्तानंतर श्रीशनी मंत्र,स्तोत्र व चाळीसाचे पठण करावे.
३) शनिवारी तळलेली गोड पुरी काळ्या कुत्र्याला व कावळ्याला खाऊ घालावी.
५)भिकारी,अपंग,कोडी,अंध यांना काळे वस्त्र व लोखंडाच्या दैनदिन जीवनात लागणाऱ्या वास्तू दान कराव्यात.
६)आपला कर्मचारी,नोकर,सेवकाबरोबर योग्य व्यवहार करावा.
७)प्रसिद्ध श्रीशनी स्थळी जाऊन अभिषेक करावा.
श्रीशानिदेवाच्या प्रसन्नतेची ओळख  
जन्मतःच श्रीशनी २,५,९ व्या स्थानात(चंद्रापासून)किंवा चंद्रापासून ३,७,१० स्थानात श्रीशनीदेव असतील टर ते प्रसन्नतेचे सुचक आहे.पण तेच शानिदेव शत्रू राशीत,निचेचा किंवा चंद्रमा,सूर्य व राहूच्या बरोबर असेल टर त्यांच्या शुभफलात न्यूनता आणते.श्रीशनीची अर्धीच कृपा राहील.किंवा चंद्रापासून श्रीशनी २,५,९ च्या राशीत किंवा३,७,१०व्याराशीत अनुक्रमे वृषभ,सिंह,धनु  किंवा मिथुन,तुळ,मकर राशीत असतील तर श्रीशनीची खुप प्रसन्नता मिळते व ते खुप चांगले मानले जाते.हि सर्व पुर्व जन्माची चांगली फळे मिळतात. ह्याच्या उलट जर शानिदेव चंद्रापासून १,६,११ वा ४,८,१२ तर याला श्रीशनिची पीडा किवा प्रकोप मानला जातो.
जर १,६,११,४,८,१२ व्या स्थानात श्रीशानिदेव शत्रूराशीत निचीचा होऊन अस्त होऊन चंद्र,सुर्य,राहु,केतुच्या बरोबर असतील तरत्याची तीव्र वाईट फळे मिळतील.शानिदेव प्रसन होत नाहीत.
लोखंडाचा व्यापार,कोळशाचा व्यापार,पेट्रोल,डिसेल,तेलाचा व्यापार,मेडीकल,मशिनरी,फॅक्टरी,वाहन,टान्सपोर्ट, गॅरेज,मेकॅनिक,ऑटोपार्टस,काळ्या वस्तुंचा वापर,चिकीत्सा क्षेत्र,कोर्ट कचेरी संबंधित वकील,न्यायाधीश,अध्यात्म संबंधित कोणतेही मिशन चालवण्याच्या संबंधित,हार्डवेअरचा व्यापार हे सर्व व्यापार श्रीशानीच्या अधिपत्याखाली येतात.जर हे सर्व व्यवसाय व्यवस्थित चालत असतील तर श्रीशानिदेवांची कृपा आहे हे समजावे अन्यथा नाही.जर वरील व्यवसाय बंद करण्याची वेळ येत असेल तर श्रीशानिदेवांचा प्रकोप आहे असे समजावे.
शुगर,लकवा,उजव्या अंगाची पीडा,वात,संधिवात,गँस्ट्रीक अँटँक,किडनी रोग,पायांचे वारंवार फाटणे,उडीदडाळ,तळलेले पदार्थ न पचणे,काळा रंग वापरल्यास वारंवार त्रास होणे,लोखंडापासून वारंवार इजा होत असेल तर श्रीशानीचा प्रकोप समजावा.
श्रीशनी देवतांचे संबंधित देवतागण
१)पिंपळाच्या झाडाखालील शिवलिंग
२)श्री हनुमानजी
३)श्री तिरुपती बालाजी
४)श्री भैरवनाथ
अनिष्ट श्रीशनीच्या शांतीसाठी उपाय
१)प्रत्येक शनिवारी सुर्योदयापूर्वी उठुन श्रीशानिंची आराधना करावी.
२)ज्या शनिवारी श्रीशानिंचे उत्तरा भाद्रपद नक्षत्र असेल त्यावेळी शमी वनस्पतीची मुळी घरी घेऊन यावी व ती गंगाजलाने धुऊन काळ्या कपडयातबांधुन उजव्या हाताच्या मनगटाला बांधावी.हि श्रीशनीपीडा निवारणाचा चांगला उपाय आहे.
३)ज्यावेळी श्रीशनीचें तीन नक्षत्रांपैकी(अनुराधा,पुष्य,उत्तर भाद्रपदा)कोणतेही नक्षत्र असेल त्यावेळी भोजपत्र घेऊन ते स्वच्छ करा व त्यावर(चौकोनी तुकडयावर) श्रीशनी यंत्र काढावे.त्याला विधिवत अक्षता, पुष्प, कुंकू,नैव्यद्य,धुप,दीप दाखवुन त्याचे पुजन करा.नंतर त्याची घडी घालुन काळ्या कपडयात गुंडाळून काळ्या धाग्याने ते उजव्या हाताच्या दंडाला बांधावे.व त्याआधी श्रीशनी मंत्राचा १०८ वेळा मंत्र जप करावा.श्रीशनी रोग निवारणार्थ हा चांगला उपाय आहे.
४)ह्या यंत्राला प्रत्येक शनिवारी बनवुन त्याची पूजा करून आपली समस्या,कष्ट बोलुन वाहत्या पाण्यात सोडावे.त्याने सुद्धा लाभ होतो.
५)दररोज सकाळी उठल्यावर दक्षिण दिशेला नमस्कार करून श्रीशनीदेवांच्या १० नावांचा ११ वेळा उच्चार करूनच अंथरून सोडावे.
७)दररोज रात्री झोपण्यापूर्वी श्रीशनी चालीसा किंवा श्रीशनि मंत्राचा पाठ करावा
श्रीशनी पीडा निवारण मंत्र,तंत्र,व उपाय
१)तांत्रोक्त मंत्र २)पौराणिक मंत्र ३)वैदिक मंत्र ४)श्रीशनी गायत्री मंत्रवरीलपैकी कोणत्याही लघु मंत्राचा चालता फिरता किंवा कोणतेही कार्य करताना म्हणला पाहिजे. ज्यावेळी मनावर किवा शरीरावर श्रीशनी पीडा असेल,शारीरिक कष्ट असेल त्याच्या मुक्तीसाठी मंत्र पठाण करत राहिले पाहिजे.
अ)तांत्रोक्त मंत्र-ज्यावेळी श्रीशनी साडेसाती किंवा श्रीशनी ढय्या चालु असेल त्यावेळी दररोज १ माळ करावी.
ब)पौराणिक मंत्र- ज्यावेळी श्रीशनी महादशा किंवा अंतर्दशाचालु असेल किंवा कोणतेही काम रखडलेले असेल तर ह्या मंत्राचा जप करावा. आती भारी संकट असेल तर ह्या मंत्राचा २३००० जप २३ दिवसात करावा
क)वैदिक मंत्र- ह्याने श्रीशनी शांती यज्ञ करावा.
ड)श्री गायत्री मंत्र- संपुर्ण परिवाराच्या सुख शांतीसाठी ह्या मंत्राचा पाठ करावा.ज्या शनिवारी श्रीशानीचे नक्षत्र असेल त्यावेळी श्रीशनी यंत्र घरी आणावे.प्रत्येक शनिवारी लोखंडाच्या पत्र्यावर स्थापन असलेल्या यंत्रावर मंत्र म्हणत मोहरीच्या तेलाचा १०८ वेळा अभिषेक करावा.नंतर ते तेल दुसऱ्या भांड्यात घ्यावे.ते यंत्र स्वच्छपुसुन त्याची अक्षता,धुप,दीप,कुंकू विधिवत पूजा करावी.ते यंत्र ठेवून द्यावे आणि हे तेल लोखंडाच्या दिव्यात जाळावे.हा उपाय साडेसाती, पानौतीसाठी खुप उपयुक्त आहे.जर हाच विधी अमावस्येला केल्यास रखडलेली कामे मार्गी लागतील.अभिषेक केलेले तेल आपल्या बाधा निवारणार्थ,श्रीशनी कृपाप्राप्तीसाठी प्रार्थना करून घरीच लोखंडाच्या दिव्यात जाळावे.
श्रीशनि अनिष्टापासून वाचण्याचे उपाय
श्रीशनिचा संबंध लोखंडाशी आहे.त्यामुळे घर किंवा व्यवसाय येथे लोखंडाच्या फर्निचरचा उपयोग करावा,जर श्रीशनी पत्रिकेत निचीचा असेल तर लोखंडी फर्निचरचा वापर कधीही करू नये.
मेष राशीचा निचीचा,वृश्चिक राशीचा त्रासदायक,कर्क व सिंह राशीवर अस्त असलेल्या श्रीशनी पीडेसाठी उपाय
प्रतिदिन सुर्योदयापुर्वी उठुन दक्षिण दिशेला नमस्कार करून पश्चिम दिशेला तोंड करून श्रीशनी देवाचे स्मरण करा.
२)ज्या शनिवारी श्रीशनींचे ३ पैकी कोणतेही नक्षत्र असेल त्यादिवशी काळ्या वस्तूंचे दान करावे.
३)प्रत्येक शनिवारी श्रीशनी मंदिरात जा व पिंपळाला पाणी घालुन गोडे पाणी,काळे तीळ,उडीद सहित अर्पण करावे.
४)काळी गाय पाळा व प्रत्येक दिवशी व विशेष करून शनिवारी भरपूर चारा किंवा जेवण भरवा.
५)श्रीशनीचे नक्षत्र ज्यावेळी शनिवारी असेलत्यावेळी काळ्या म्हैशीला काळे चणे शिजवून त्यात मीठ घालुन पोटभर खायला द्यावे.
श्रीशनी साडेसाती उपाय
१)श्रीशनी साडेसाती पौराणिक मंत्राचा २३००० जप साडेसात वर्षाच्या आत करणे बंधनकारक आहे.२३,००० जप २३ दिवसात संपायला पाहिजे.जर जातक १५ वर्षाच्या आतील आहे तर त्यासाठी त्याच्या आई वडिलांनी किंवा पुरोहिताने मंत्र जप केला तर चालतो.ह्या काळात सात्विक जेवण घ्यावे,जमिनीवर चटईवार झोपावे,ब्रह्मचर्यपाळावे.एकाच बैठकीत जप पुर्ण करावा.(मंत्र-निलांजन समाभासं...)
२) साडेसातीच्या काळात जेवढे पण श्रीशनी अमावस्या येईल त्यावेळी अर्धा मीटर काळे कापड घ्यावे त्यावर श्रीहनुमानाचे शेंदुरमध्ये मोहरीचे तेल घेऊन त्या काळ्या कपडयावर श्रीशनीचे १५चे यंत्र काढावे व त्यावर बिना पाण्याचा नारळ घेउन्तो आपल्या शरीरावरून ७ वेळा उतरून श्रीशनिदेवांना स्मरून व आपली पीडा सांगून ,ती निवारणार्थ प्रार्थना कराविव तो नारळ काळ्या कापडयासहित वाहत्या पाण्यात सोडवा.

श्री शनि महादशा शांती उपाय
१)दररोज सुर्योदयापुर्वी उठावे व अंथरुणातच श्रीशनीच्या १० नावाचा ११ वेळा उच्चार करावा. त्यापूर्वी दक्षिण दिशेला नमस्कार करावा.
२)१९ वर्षाच्या श्रीशनी महादाशेमध्ये श्रीशनी वैदिक मंत्राचा संकल्प घेऊन सव्वा लाख जप करणे जातकाला अनिवार्य आहे.कमीत कमी नित्य १ माळ जप झालाच पाहिजे.
वैदिक मंत्र-ॐ शन्नो देवीर भीष्टय आपो भवंतुपीतये
                शन्नो रभि स्त्रवंतु नमः
३)शनि महादशेमध्ये प्रत्येक अमावस्येला घरची वा व्यावसायिक ठिकाणची चांगली स्वच्छता करावी व अमावस्या सुरु झाल्यापासून संपेपर्यंत दिव्यामध्ये मोहरीचे तेल घेऊन त्या मौली धागा(पंचरंगी)धाग्याची वात घालून दिवा तेवत ठेवावा.
४)प्रत्येक अमावस्येला बाधा निवारणासाठी पिपंळावर नारळ वाढवावा.
निचेचा शनि उपाय
१)शनिवारी कोणतेही शुभ कार्य करू नका.
२)पश्चिम दरवाजा असलेल्या घरात राहु नका किंवा त्याला आपले नाव देऊ नका किंवा पश्चिमद्वारवाल्या ठिकाणी व्यवसाय करू नका.
३)प्रत्येक शनिवारी एका तांब्यात पाव लिटर दूध घालुन कोणत्याही विहिरीत श्रीशनी मंत्र म्हणत अर्पण करावे.
४)दररोज श्रीशनिचा पौराणिक मंत्राचा १ माळ जप करावा व श्रीशनिदेवांना त्यांचा क्रोध शांत करण्यासाठी प्रार्थना करावी.
५)प्रत्येक शनिवारी सुर्योदयापुर्वी गुळ,काळे तील,उडीद यांचे पाणी पिपंळाला ७ प्रदक्षिणा करत अर्पण करावे व मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.
६)घरात काळ्या टाईल्स, मार्बल,काळा रंग  किंवा काळ्या रंगाचे कपडे वापरू नयेत.
७)कधीही फँक्टरी,मशिनरी,लोखंड,कोळसा,तेल,पेट्रोल,धातू,गँरेज,ऑटो पार्टस,ट्रान्सपोर्टची कामे/व्यवसाय आपल्या नावाने किंवा एकटे करू नये.
८)भाऊ, वडील सोडुन इतर कोणाबरोबर पार्टनरशिप करू नका.
९)आपल्या नावाने मालमत्ता किंवा गाडी घेऊ नका नाहीतर विकण्याची वेळ येईल,नुकसान सोसावे लागेल.
१०)दोन्ही वेळचे जेवण करताना पहिली चपाती बाजुला काढुन ठेवावी व ती कुत्र्याला खाऊ घालावी.
११)श्रीशनैश्चर अमावस्येला आपले कोणतेही वापरलेले वस्त्र गरिबाला दान करावे व प्रार्थना करावी की जोपर्यंत हे वस्त्र ती व्यक्ती वापरेल तोपर्यंत  त्याचा आशिर्वाद मला लाभू दे.
१२)स्वतःच्या वाहनाने प्रवास करताना श्रीशनी मंत्र किंवा श्री हनुमानचालिसा पाठ जरूर ऐकावा.
१३)शनिवारी श्रीशनी पीडा शांतीसाठी अजिबात क्रोध करू नये.
श्रीशनी दोष शांती हेतु आवश्यक निर्देश
१)संकल्प करा की साडेसातीची पीडा कमी होण्यासाठी दररोज सुर्योदयापुर्वी उठेन.
२)सकाळी उठल्यावर अंथरुणातच श्रीशनिदेवांच्या १० नावांचे ११ वेळा जप करावा.
३)शनिवारी लोखंड,कोळसा,तेल व्यवसायाची सामग्री, चमडयाच्या वस्तू,मशिनरी कधीही खरेदी करू नये.
जन्मापासुन श्रीशनी लागले असतील तर.. 
ज्यांचा जन्म श्रीशनिंच्या नक्षत्रात झाला आहे,ज्यांचा जन्म चढत्या,मध्यस्त,उतरत्या साडेसातीत झाला आहे, ज्यांचा जन्म श्रीशनैश्चर अमावस्येला झाला आहे त्यांना जन्मस्त श्रीशनी लागतो.श्रीशानीच्या संदर्भात जन्म घेणाऱ्या सगळ्याचे आयुष्य हे श्रीशनीने प्रभावित असते.त्यामुळे श्रीशनी  त्यांचा भाग्योदय असतो.खालील नियम आयुष्यभर पाळावे लागतील .
१) )सकाळी उठल्यावर अंथरुणातच श्रीशनिदेवांच्या १० नावांचे ११ वेळा जप करावा.
२)सकाळी उठल्यापासून आंघोळ होऊन नित्य कर्म होईपर्यंत मौन पाळा.(कमीत कमी २तास)
३)जेवणात मीठ कमी असल्यास वरुन काळे मीठ वापरावे.
४)जेवणानंतर लवंग खावी.
५)दुपारी व रात्री जेवताना मौन पाळावे.
६)शनिवारी कुणालाही रागाऊ नका,क्रोध करू नका.
७)प्रतिदिन श्रीशनिंचा पौराणिक मंत्राचा १ माळ जप करावा.
८)घरातील वडीलधारी लोकाचा मानसन्मान ठेवा,त्यांची सेवा करा.
९)आपल्या घरातील महिलांशी सहानभुतीने,स्नेहाने वागा.
१०)मांसाहार व दारू यांचे सेवन करू नये.
११)काळा किंवा भगवा(केसरी)ह्यांचा तुम्ही जास्तीत जास्त वापर करायला हवा.
१२) शनिवारी काळ्या वस्तू, लोखंड,कोळसा,तेल, चमडयाच्या वस्तू,काळा कपडा,उडीद,काळे तीळह्याचे श्रीशनि मंदिरात जरूर दान करावे.
१३) प्रत्येक श्रीशनैश्चर अमावस्येला गरिबांसाठी  अन्नदान करावे.
१४)प्रत्येक शुभ कामे शनिवारीच करावीत.
१५)शमी झाडांची मुळी काढुन काळ्या कपडयात ,उजव्या हातात बांधावी.

जन्मताच श्रीशनि पाया
मूळ कुंडलीत श्री शनिची चंद्रापासून असणाऱ्या स्थितीवर श्रीशनि पाया ठरतो.
भाव             पाया      परिणाम
१,६,११,     सोने       साधारण-परिवारासाठी चांगले(बालपण चांगले,किशोर व युवा अवस्था सोन्यासारखे तपावे लागते.
२,५,९        चांदी       चांगला-सुखप्राप्ती होते.समाधानकारक जीवन,संपत्ती सुख
३,७,१०      तांबे        मध्यम-आनंद व प्रगतीकारक,ना अधिक कष्ट ना अधिक  संपन्नता
४,८,१२      लोखंड    अति कष्ट-अत्याधिक कष्ट
 श्रीशनि पीडा शांती उपाय  
खालील उपाय वारंवार करावेत, श्रीशनिदेव  प्रसन्न होतात.
१)गुळापासून बनवलेले पदार्थ प्रत्येक अमावस्येला श्रीशनिदेवाला नैवेद्य दाखवुन अधिकाधिक लोकांना प्रसाद वाटावा.गुळ घालुन गोड पुरी मोहरीच्या तेलात तळली तर अधिकच उत्तम.
२)तिळगुळाचे लाडू व रेवडी श्रीशनिदेवांना प्रत्येक शनिवारी अर्पण करून लोकांमध्ये वाटावी.
३)उडीदाच्या डाळीचे वडे मोहरीच्या तेलात तळुन शनिवारी श्रीशनिदेवांना दाखवुन सर्वाना वाटावे व कावळ्यांना सुद्धा खायला द्यावेत.
४) प्रत्येक शनिवारी एका वाटीत तेल घेवुन त्यात आपला चेहरा बघून ते तेल श्री शनि मंदिरातील दिव्यासाठी दान द्यावे. 
५)कोणत्याही श्रीशनैश्चर अमावस्येला १ लिटर मोहरीचे तेल शत्रूपासून मुक्ती  मिळण्यासाठी व विजयी होण्याची प्रार्थना करून वाहत्या पाण्यात सोडावे.
६) गुळ, काळा कपडा,काळे उडीद,काळे तीळ,मोहरीचे तेल,लोखंडाचे कोणतेही भांडे कोणत्याही श्रीशनैश्चर अमावस्येला  श्रीशनि मंदिरात जरूर दान करावे किंवा एखाद्या गरीब,वृद्ध व्यक्तीस श्रद्धापूर्वक नमस्कार करून ह्या वस्तू दान कराव्यात.सर्व वस्तूंची मात्रा कमीतकमी पाव-पाव किलो असावी.दान करताना सतत श्रीशनि मंत्राचा जप करावा.
७)आपल्या  घराच्या  नैऋत्य कोपऱ्यात अंधार ठेवावा.हे स्थान अधिक उंच व वजनदार असावे व ह्या अंधाऱ्याजागेत ९ बदाम काळ्या कपडयात बांधुन ठेवावेत.
८) प्रत्येक शनिवारी पिंपळाला गुळाचे गोड पाणी,काळे तीळ,काळे उडीद सहित पाणी ७ प्रदक्षिणा घालत सुर्योदयापुर्वी अर्पण करावे.
९)दररोज  सकाळी सुर्योदयापुर्वी  उठून अंथरुणातच दक्षिण दिशेला नमस्कार करून  श्रीशनिदेवांच्या १० नावांचे ११ वेळा जप करावा.
१०) सुर्योदयापुर्वी पिपळांच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.
११)ज्या शनिवारी अनुराधा,पुष्य,उत्तरा भाद्रपदा नक्षत्रांपैकी कोणतेही नक्षत्र असेल त्या दिवशी श्रीशनिदेवांच्याआवडत्या वस्तू दान कराव्यात. ह्या दिवशी श्रीशनिदेव मंत्राचा जप सुद्धा लाभदायक ठरतो.
१२)कोणत्याही शानिवारी काळा रेशमी धागा आपल्या उजव्या हाताच्या मनगटाला मंदिराच्या पुजाऱ्याकडून बांधून घ्यावा.हा धागा श्रीशनि कृपेसाठी कमीतकमी ९ शनिवार असावा.  काळा धागा आपल्या उजव्या हातात  बांधल्याप्रमाणेच आपल्या उजव्या पायाच्या अंगठयाला आणि उजव्या पायाला(पैंजनाप्रमाणे)कोणत्याही कन्येकडून बांधुन घ्यावा.जितके जास्त दिवस ते  राहील तेवढे  श्रीशनि कष्ट कमी होईल.
१३)शनिवारी काळे वस्त्र अवश्य परिधान करावे.शनिवारी उडीदाची डाळ जेवणात अवश्य घ्यावी.चमेलीचे तेल केसांना लावूनच  घरातुन बाहेर पडावे.डोळ्यात काजळ किंवा  सुरमा जरूर घालावा.शनिवारी तेलापासून तळलेले पदार्थ दान करावेत.स्वास्थ लाभासाठी  औषधे शनिवारपासून घ्यायला सुरुवात करावी.  


                         
                  
         
       
  



Wednesday, October 23, 2019

भीमरूपी स्तोत्र


   ।। भीमरूपी स्तोत्र ।।
                 भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती । वनारी अंजनीसुता रामदुता प्रभंजना  ।।१।                             महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळें । सौख्यकारी दुःखहारी धुर्त वैष्णव गायका ।।२।।
दीननाथा हरीरूपा सुंदरा जगदंतरा । पातालदेवताहंता भव्यसिंदुर लेपना  ।।३।।
लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना । पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ।।४।।
ध्वजाग्रें उचली बाहो आवेशें लोटला पुढें । काळाग्नी काळरुद्राग्नी देखतां कांपती भयें  ।।५।।
ब्रम्हांडे माइली नेणों आवळे दंतपंगती । नेत्राग्नी चालिल्या ज्वाला भृकुटी ताठील्या बळें ।।६।।
पुच्छ ते मुरडिलें  माथां किरीटी कुंडले बरीं । सुवर्ण कटी कांसोटी घंटा किंकिणी नागरा  ।।७।।
ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळु । चपळांग पाहतां मोठे महाविद्द्युल्लतेपरी  ।।८।।
कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे । मंद्रादीसारखा द्रोणु क्रोधें उत्पाटीला बळे  ।।९।।
आणिला मागुती नेला आला गेला मनोगती । मनासी टाकिले मागे गतीसी तुळणा नसे ।।१०।।

अनुपासोनी ब्रम्हांडा एवढा होत जातसे । तयासी तुळणा कोठे मेरूमंदार धाकुटे ।।११।।
ब्रम्हांडाभोवतें वेढे वज्रपुच्छें करू शके । तयासी तुळणा कैची ब्रम्हांडी पाहता नसे ।।१२।।
आरक्त देखिले डोळां ग्रासिले सुर्यमंडळा । वाढतां वाढतां वाढे भेदिलें शुन्यमंडळा ।।१३।।
धनधान्य पशुवृध्दी पुत्रपौत्र समस्तही । पावती रूपविद्यादी स्तोत्रपाठे करुनिया ।।१४।।
भुतप्रेतसमंधादी रोगव्याधी समग्रही । नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने ।।१५।।
हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरी । दृढदेहो निसंदेहो संख्या चंद्रकळा गुणे ।।१६।।
रामदासी अग्रगण्यु कपिकुळासी मंडणु । रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासती ।।१७।।
।। इति श्रीरामदासकृतं संकटनिरसनं मारुती स्तोत्र संपुर्णं ।।