।। भीमरूपी स्तोत्र ।।
भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान
मारुती । वनारी अंजनीसुता रामदुता प्रभंजना ।।१। महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळें ।
सौख्यकारी दुःखहारी धुर्त वैष्णव गायका ।।२।।
दीननाथा हरीरूपा सुंदरा जगदंतरा ।
पातालदेवताहंता भव्यसिंदुर लेपना ।।३।।
लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना ।
पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ।।४।।
ध्वजाग्रें
उचली बाहो आवेशें लोटला पुढें । काळाग्नी काळरुद्राग्नी देखतां कांपती भयें ।।५।।
ब्रम्हांडे
माइली नेणों आवळे दंतपंगती । नेत्राग्नी चालिल्या ज्वाला भृकुटी ताठील्या बळें ।।६।।
पुच्छ
ते मुरडिलें माथां किरीटी कुंडले बरीं ।
सुवर्ण कटी कांसोटी घंटा किंकिणी नागरा ।।७।।
ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळु ।
चपळांग पाहतां मोठे महाविद्द्युल्लतेपरी ।।८।।
कोटीच्या
कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे । मंद्रादीसारखा द्रोणु क्रोधें उत्पाटीला बळे ।।९।।
आणिला
मागुती नेला आला गेला मनोगती । मनासी टाकिले मागे गतीसी तुळणा नसे ।।१०।।
अनुपासोनी ब्रम्हांडा एवढा होत जातसे । तयासी तुळणा कोठे
मेरूमंदार धाकुटे ।।११।।
ब्रम्हांडाभोवतें
वेढे वज्रपुच्छें करू शके । तयासी तुळणा कैची ब्रम्हांडी पाहता नसे ।।१२।।
आरक्त
देखिले डोळां ग्रासिले सुर्यमंडळा । वाढतां वाढतां वाढे भेदिलें शुन्यमंडळा ।।१३।।
धनधान्य
पशुवृध्दी पुत्रपौत्र समस्तही । पावती रूपविद्यादी स्तोत्रपाठे करुनिया ।।१४।।
भुतप्रेतसमंधादी
रोगव्याधी समग्रही । नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने ।।१५।।
हे
धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरी । दृढदेहो निसंदेहो संख्या चंद्रकळा गुणे ।।१६।।
रामदासी
अग्रगण्यु कपिकुळासी मंडणु । रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासती ।।१७।।
।। इति श्रीरामदासकृतं
संकटनिरसनं मारुती स्तोत्र संपुर्णं ।।