Wednesday, October 23, 2019

भीमरूपी स्तोत्र


   ।। भीमरूपी स्तोत्र ।।
                 भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती । वनारी अंजनीसुता रामदुता प्रभंजना  ।।१।                             महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळें । सौख्यकारी दुःखहारी धुर्त वैष्णव गायका ।।२।।
दीननाथा हरीरूपा सुंदरा जगदंतरा । पातालदेवताहंता भव्यसिंदुर लेपना  ।।३।।
लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना । पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ।।४।।
ध्वजाग्रें उचली बाहो आवेशें लोटला पुढें । काळाग्नी काळरुद्राग्नी देखतां कांपती भयें  ।।५।।
ब्रम्हांडे माइली नेणों आवळे दंतपंगती । नेत्राग्नी चालिल्या ज्वाला भृकुटी ताठील्या बळें ।।६।।
पुच्छ ते मुरडिलें  माथां किरीटी कुंडले बरीं । सुवर्ण कटी कांसोटी घंटा किंकिणी नागरा  ।।७।।
ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळु । चपळांग पाहतां मोठे महाविद्द्युल्लतेपरी  ।।८।।
कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे । मंद्रादीसारखा द्रोणु क्रोधें उत्पाटीला बळे  ।।९।।
आणिला मागुती नेला आला गेला मनोगती । मनासी टाकिले मागे गतीसी तुळणा नसे ।।१०।।

अनुपासोनी ब्रम्हांडा एवढा होत जातसे । तयासी तुळणा कोठे मेरूमंदार धाकुटे ।।११।।
ब्रम्हांडाभोवतें वेढे वज्रपुच्छें करू शके । तयासी तुळणा कैची ब्रम्हांडी पाहता नसे ।।१२।।
आरक्त देखिले डोळां ग्रासिले सुर्यमंडळा । वाढतां वाढतां वाढे भेदिलें शुन्यमंडळा ।।१३।।
धनधान्य पशुवृध्दी पुत्रपौत्र समस्तही । पावती रूपविद्यादी स्तोत्रपाठे करुनिया ।।१४।।
भुतप्रेतसमंधादी रोगव्याधी समग्रही । नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने ।।१५।।
हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरी । दृढदेहो निसंदेहो संख्या चंद्रकळा गुणे ।।१६।।
रामदासी अग्रगण्यु कपिकुळासी मंडणु । रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासती ।।१७।।
।। इति श्रीरामदासकृतं संकटनिरसनं मारुती स्तोत्र संपुर्णं ।।

No comments:

Post a Comment